lekha koshagar bharti 2025 महाराष्ट्र लेखा व कोषागार विभागात भरती । कोकण विभाग जाहिरात प्रसिद्ध । नौकरी मिळवण्याची सुवर्ण संधी
बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी, महाराष्ट्र लेखा आणि कोषागार विभागात नव्याने भरती होत आहे. एकूण 6 विभागातील जाहिराती आता प्रसिद्ध झाल्या आहेत. कोकण विभागात सर्वाधिक ( 179 जागा ) साठी दिनांक 31 जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे एकूण जवळपास एक ते दोन लाखांची भरती लवकरच केली जाणार आहे अशी घोषणा केली होती, त्यानुषंगाने आता प्रत्येक विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. बेरोजगार तरुणांसाठी हि एक सुवर्ण संधी आहे.
कोणत्या विभागात किती जागा आहेत ?
- कोकण विभाग - 179
- पुणे विभाग - 75
- नाशिक विभाग - 59
- नागपूर विभाग - 56
- अमरावती विभाग - 45
- छत्रपती संभाजीनगर - 42
अर्ज करण्यासाठी पात्रता :-
- कोणत्याही शाखेतील पदवी
- मराठी टंकलेखन प्रमाणपत्र मराठी ३० किंवा इंग्रजी ४० ( कोणतेही एक )
लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम
1) मराठी - 25 प्रश्न (50 गुण )
2) इंग्रजी - 25 प्रश्न (50 गुण )
3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी - 25 प्रश्न (50 गुण )
4) सामान्य ज्ञान - 25 प्रश्न (50 गुण )
एकूण - 100 प्रश्न ( 200 गुण )
प्रश्नांचा दर्जा - पदवी
(मराठी-इंग्रजी प्रश्नांसाठी 12 वी चा दर्जा असेल)
अर्ज करण्यासाठी Link :-
Tags
नौकरी