Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा 8 वा हफ्ता कधी मिळणार ?

 


महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय असणारी लाडकी बहीण योजना या योजनेचा आठवा हप्ता महिलांच्या खात्यावर कधी जमा होणार ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना  महाराष्ट्रामध्ये उत्तुंग प्रतिसाद मिळाला आणि अनेक लाभार्थी महिलांना या योजनेचा फायदा घेता आला परंतु निवडणुका झाल्यानंतर च्या योजनेतील काही लाभार्थी महिलांचे कागदपत्रे तपासण्यात येत आहेत त्यामुळे त्यांना मिळणारा लाभ हा काही काळासाठी थांबवण्यात आलेला दिसतो.

ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेमध्ये अटी घालण्यात आल्या होत्या त्या अटींची पूर्तता न करणाऱ्या अर्जदार महिलांचे कागदपत्रे तपासले जात आहेत जेणेकरून अपात्र अर्जदारांना या योजनेतून वगळण्यात येईल.

जानेवारी महिन्यामध्ये दिला जाणारा हप्ता हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला असला तरी देखील काही महिलांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले दिसत नाहीत त्याचे एकमेव कारण म्हणजे महिलांनी फॉर्म भरतेवेळी केलेल्या काही चुका.

लाडकी बहीण योजनेतून अपात्र होण्याची कारणे :- 

  • जर अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवाशी नसेल.
  • अर्जदार महिलेचे उत्पन्न 2 लाखांपेक्षा अधिक असेल.
  • अर्जदार महिलेने जमा केलेल्या कागदपत्रात त्रुटी असतील, जसे की, कागदपत्रांमधील वेगवेगळी नावे, bank सोबत आधार link नसणे आणि वयाचा पुराव्यात त्रुटी असणे.

लाडक्या बहिणींना 8 वा हफ्ता कधी मिळेल ? 

जानेवारी महिन्याचा हफ्ता सर्वच महिलांना अजून मिळालेला नाही, अर्जामधील त्रुटी तपासून योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी माहिती बातम्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

महिला आणि बालविकास मंत्री मा. आदीतीजी तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे महिलांना 8 वा हफ्ता फेब्रुवारी महिन्यांमध्ये जारी केला जाईल. 

लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ! 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने