18 हजार 882 उमेदवारांना आता नौकरी ची संधी मिळणार.
राज्यात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे अशावेळी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही बेरोजगार तरुण-तरुणींसाठी आनंदाची बाब आहे, यासाठी सरकारच्या निर्णयाची नक्कीच प्रशंशा करायला हवी.
दरवर्षी हजारो विद्यार्थी हे पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीच्या शोधात बाहेर पडतात परंतु त्यांना म्हणावी तशी नोकरी मिळणं अवघड झालेला आहे आणि अशावेळी विद्यार्थ्यांमध्ये सरकारी नोकरीमध्ये जाण्याची इच्छा होतांना दिसते.
सद्यस्थितीत 14 फेब्रुवारी ते दोन मार्च 2025 पर्यंत महिला आणि बाल विकास विभागातील काही पदांची परीक्षा पार पडत असताना, नवीन पदभरतीचा घेतलेला निर्णय हा नक्कीच बेरोजगार तरुण-तरुणींसाठी अत्यंत दिलासादायक आहे.
"महिला आणि बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयीन दालनात बैठक घेतली. महाराष्ट्र शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका व 13243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18282 पदांची भरती करण्यात येणार आहे.
14 फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठी ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले, यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या."
- मा. मंत्री. आदीतीताई तटकरे
महिला आणि बालविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य.
सध्या सुरू असलेली मुख्य सेविका पदासाठीची परीक्षा पार पडल्यानंतर पुढील परीक्षेचे नियोजन केलं जाण्याची दाट शक्यता आहे